शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील युवतीची पर्स मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:18 IST

अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली.

ठळक मुद्देरिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : पोलिसांकडून सत्कार

नाशिकरोड : अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली.नाशिकला इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर कनन तेजनानी या सध्या अमेरिकेत आयटी इंजिनिअरिंगची नोकरी करत आहेत. सुट्टीनिमित्त त्या टाकळीरोड येथील ड्रीमसिटीमध्ये आपल्या घरी आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तेजनानी या मैत्रिणीसह दुचाकीवरून नाशिकरोडच्या दिशेने येत असताना आंबेडकरनगरजवळ त्यांची पर्स रस्त्यात खाली पडली. यावेळी पाठीमागून येणारे रिक्षाचालक कुमार प्रभाकर जाधव यांना रस्त्यात पडलेली सदर पर्स सापडली. रिक्षाचालक जाधव यांनी सापडलेली पर्स नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून दिली. मात्र सदर बाब उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने जाधव यांना उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.सदर बाब पोलीस नियंत्रण कक्षास कळविण्यात आली. त्यानंतर रिक्षाचालक जाधव यांनी वास्को चौकातील पान दुकानदार मित्रास पर्स सापडल्याची माहिती दिली.यावेळी तेथून जाणारे नाशिकरोडचे बिट मार्शल पोलीस गणेश गोसावी, विकास ढेरिंगे यांना रिक्षाचालक जाधव व टपरीचालक मित्रांनी पर्स सापडल्याची माहिती दिली. गोसावी व ढेरिंगे यांनी उपनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पर्समधील कागदपत्रांच्या आधारे कनन तेजनानी यांचा मोबाइल नंबर शोधून त्यांना हरवलेली पर्स सापडली असल्याची माहिती दिली.महत्त्वाची कागदपत्रे दिली परतकनन तेजनानी यांनी आपली पर्स व त्यामधील डॉलर, व्हिसा, पासपोर्ट, ड्रायिव्हंग लायसन्स आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची ओळख दिल्यानंतर सदर पर्स पोलिसांनी त्यांच्या हवाली केली. वरिष्ठ निरीक्षक एन. एस. माईनकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जाऊन रिक्षाचालक कुमार जाधव याचा सत्कार केला. तर तेजनानी यांनीदेखील रोख बक्षीस दिले. यावेळी गणेश गोसावी, विकास ढेरिंगे, जनार्दन गायकवाड, प्रकाश आरोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस