शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

अमेरिकेचे वाणिज्यदूत थेट गोदाकाठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:58 IST

भारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेतली.

ठळक मुद्देरामकुंडावर गंगापूजन : फेरफटका मारत न्याहाळला गोदाकाठ

नाशिकभारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेतली. डेविड यांनी २७ ऑगस्ट २०१९ साली भारताच्या अमेरिकेच्या वाणिज्यदूत पदाचा (कॉन्सल जनरल) पदभार स्वीकारला. त्यांचे मुंबई येथे कार्यालय आहे. रॅन्झ हे त्यांच्या पत्नी परराष्ट्र सेवा अधिकारी टॅली लिंड यांच्यासोबत नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर रविवारी आल्या होत्या. त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिल्यानंतर रामकुंडावर हजेरी लावली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हेदेखील उपस्थित होते. पुरोहित संघ व गंगा-गोदावरी मंदिराच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी सपत्नीक गोदाकाठावर पायी फेरफटका करत गांधी तलाव, देवमामलेदार मंदिर परिसर, निळकंठेश्वर मंदिर, दुतोंड्या मारुतीची भव्य मूर्ती न्याहाळत येथील आकर्षक कलाकुसर असलेल्या पुरातन मंदिरांसमोर आपली छबीदेखील मोबाइलने टिपली. यावेळी त्यांनी येथील काही दुकानांनाही भेट दिली. तसेच रामकुंडात श्रीफळ वाहिले. येथील गोमुखातून पडणाऱ्या पाण्याचेही त्यांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यातून छायाचित्र क्लिक केले.

दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी यावेळी परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त पुरविला होता. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षारक्षकदेखील होते.

टॅग्स :NashikनाशिकAmericaअमेरिका