नाशिक : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्णाला मिळणारे युरियाचे अॅलोकेशन हे पॉज मशीनमध्ये दिसणाऱ्या साठ्यावरच दिले जाणार असल्याने जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांनी येत्या दोन दिवसांत आपल्या गुदाममधील साठा आणि पॉज मशीनमध्ये दिसणारा युरियाचा साठा यांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन नाडाचे अध्यक्ष भगवान खैरनार यांनी केले आहे.आॅगस्टमध्ये युरियाचे अलोकेशन देताना केंद्रशासन राज्यातील पॉजमध्ये शिल्लक दिसणारा युरियापाहूनच अलोकेशन देणार आहे. त्यामुळे जिल्ह्णातील जुलैअखेर शिल्लक असलेला पॉजमधील युरियाचा साठा विचारात घेऊन आॅगस्टचे अलोकेशान दिले जाणार आहे. आपल्या जिल्ह्णात जुलैअखेर कमीत कमी साठा पॉजमध्ये शिल्लक राहील याची दक्षता सर्व कृषी विक्रेत्यांनी घ्यावी. येत्या दोन दिवसांत सर्व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांनी पॉजमधील शिल्लक व प्रत्यक्ष शिल्लक याचा ताळमेळ घालावा. आपला पॉज मशीनमधील शिल्लक साठा व गुदाममधील साठा यांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन भगवान खैरनार यांनी केले आहे.
पॉज मशीनमधील साठ्यावर मिळणार आॅगस्टमध्ये युरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:33 IST
नाशिक : आॅगस्ट महिन्यात जिल्ह्णाला मिळणारे युरियाचे अॅलोकेशन हे पॉज मशीनमध्ये दिसणाऱ्या साठ्यावरच दिले जाणार असल्याने जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांनी येत्या दोन दिवसांत आपल्या गुदाममधील साठा आणि पॉज मशीनमध्ये दिसणारा युरियाचा साठा यांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन नाडाचे अध्यक्ष भगवान खैरनार यांनी केले आहे.
पॉज मशीनमधील साठ्यावर मिळणार आॅगस्टमध्ये युरिया
ठळक मुद्देगुदाममधील साठा आणि पॉज मशीनमध्ये दिसणारा युरियाचा साठा यांची पडताळणी