शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

कातकरी समाजासाठी उत्थान योजना तत्काळ सुरू करावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:53 IST

ग्रामीण  अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देजनसेवा मंडळ : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाचे निवेदन

पेठ : ग्रामीण  अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पेठ-सुरगाणा जनसेवा मंडळ व  जनजाती कल्याण आश्रमामार्फत उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यातील कातकरी घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या. तरीदेखील सर्वच योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एकून सहा  विभागांपैकी कोकण, पुणे, नाशिक या तीन विभागांमध्ये कातकरी जमाती असून, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यातील सहा विभागापैकी कोकण विभागामध्ये  कातकरी बांधवांच्या विकासासाठी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी अनुलोम या सामाजिक संस्थेच्या मदतीने उत्थान योजनेला शुभारंभ करून विविध उपयोजना कार्यक्रम चालू आहेत. त्याअनुषंगाने जनजाती कल्याण आश्रम व जनसेवा मंडळ यांच्यामार्फत कातकरी समाजाच्या सर्वांगीण  विकासासाठी ‘उत्थान’ योजनेअंतर्गत तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी विभागातील कर्मचारी यांची समिती स्थापन करून कातकरी समाजाचा विकास करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.  याप्रसंगी जनजाती कल्याण आश्रमाचे स्वप्निल वाघमारे, सागर चव्हाण, जनसेवा मंडळाचे जनसेवक कमलेश वाघमारे, दिलीप महाले उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार