शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाणी समाजाच्या महाधिवेशनासाठी नाशिकमध्ये बोधचिन्हाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:25 IST

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणाऱ्या  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडविणार्‍या बोधचिन्हाचे अनावरण नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले.

ठळक मुद्देवाणी समाजाच्या बोधचिन्हाचे अनावरणबोधचिन्हातून समाजाच्या संस्कृती, परंपरेचे दर्शन

नाशिक : अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुण्यात होणाऱ्या  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडविणार्‍या बोधचिन्हाचे अनावरण नाशिकमध्ये कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले. यावेळी महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष राजेंद्र वाणी, सचिव राजेश कोठावदे, खजिनदार श्यामकांत शेंडे, जिल्हा समन्वयक सचिन बागड, सहसचिव शशिकांत येवले, सहखजिनदार अजय मालपुरे, अ‍ॅड. अशोक खुटाडे, शोभा कोतकर, शिरीष नेरकर, अशोक सोनजे व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे येथील श्यामकांत कोतकर यांनी यावेळी बोधचिन्हाविषयी माहिती दिली. लाडशाखीय वाणी समाजाच्या बोधचिन्ह मानवी शरीरात असलेल्या सात कुंडलिनी चक्रापैकी एक असलेल्या हृदयचक्र ाच्या अकाराचे असून, यातून प्रेम, विश्वास उदारता, भावनिकतेचे दर्शन घडते, तर चक्राभोवती असलेल्या १६ पाकळ्यांतून समाजाच्या १६ कुलस्वामिनी असलेले समाजबांधव एकत्र आणण्याचा प्रयत्न यातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्याचे श्यामकांत शेंडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बोधचिन्हातील हिरवा रंग प्रगती पैसा समृद्धीशी संबंधित असून, चिन्हातील चांदणी उन्नती, प्रगती, यशाचे प्रतीक आहे. त्याभोवतालचे सहा त्रिकोण हे एकत्र कुटुंबाची शक्ती दर्शवित असून, मध्यभागी असलेले चक्र उद्योग व्यवसायाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाधिवेशनाची माहिती सविस्तररीत्या समाजात तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी वाणीवार्ता या प्रसिद्धी पत्राचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक राजेश कोठावदे यांनी केले व आभार अजय मालपुरे यांनी मानले. सुत्रसंचालन पुणे येथील रत्ना दहिवेलकर यांनी केले.महाधिवेशनात उद्योग मार्गदर्शनअखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी विविध क्षेत्रांतील उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित राहणार असून, उद्योजक व्यावसायिकांसाठी व्यावसायिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात येणार आहे. महाधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात बाबा कल्याणी, संजय बजाज व हनुमंत गायकवाड यांची समाजातील व्यावसायिक उद्योजकांना मार्गदर्शन करणार असून  गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे आध्यात्मिक प्रवचनही होणार असल्याचेही  श्यामकांत शेंडे यांनी सांगितले.  

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय