शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:20 IST

रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना धास्ती

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेउर आदी परिसरात गुरुवारी (दि.१८) ला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वारे तर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.अनेक ठिकाणी द्राक्ष तोडणी काम सुरू असून चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना केवळ २० ते २५ रुपये प्रति किलो दराने भाव मिळत असतानाच त्यात अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.काढणीला आलेला गहू देखील अवकाळी पावसात सापडल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी