शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवकाळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:42 IST

कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देनाशिककरांची धांदल : बळीराजा हवालदिल; वातावरणात गारवा

नाशिक : कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. अरबी समुद्राच्या दक्षिणेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला गेला आहे. त्यामुळे पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, १७.४ अंशापर्यंत पारा वर सरकला आहे. तसेच शहरात आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढल्याने पहाटे शहरावर धुक्याची दुलई पसरते. गुरुवारी अचानकपणे दुपारपासून शहरावर ढग दाटून आले आणि कोठे हलक्या तर कोठे मध्यम स्वरुपाच्या सरींचा वर्षाव सुरू झाला. n    अंबड, सिडको, इंदिरानगर, वडाळागाव, उपनगर, जेलरोड, अशोका मार्ग, जुने नाशिक, पंचवटी, अशोकस्तंभ, गंगापूररोडसह सर्वच भागांमध्ये पावसाने संध्याकाळी उशिरापर्यंत हजेरी लावली. दुपारी साडेचार वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा साडेसहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत जोरदार सरी कोसळल्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.७ मिमी इतका पाऊस मोजला गेला.पंचवटीत पावसामुळे रस्ते ओलेचिंबगुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. पंचवटी परिसरातील सर्वच रस्ते ओलेचिंब झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यातच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. नाशिकरोडपरिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र  पाण्याचे तळे साचल्याने रहिवासी, विक्रेते, दुकानदार यांना भूमिगत गटारीची झाकणे  उघडून पावसाचे साचलेले पाणी मार्गस्थ करण्याची वेळ आली. नाशिकरोड परिसरामध्ये गुरुवारी दुपारी जवळपास दीड तास मुसळधार अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने सर्वांची धांदल उडाली होती. एकलहरेपरिसरात गुरुवारी (दि.७) दुपारनंतर धुवाधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी व भाजीपाला व्यावसायिकांची  तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचल्याने निंदणी थांबली आहे. परिणामी पिकांमध्ये गवत, तण वाढून पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस