शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:15 IST

असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.

नाशिक : असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर जात असून, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बालमजुरीत मात्र वाढ होत आहे. नाशिक शहरासह राज्यातील अनेक भागांत हेच चित्र दिसून येते.असंघटित आशा कामगारांना डावलून तो फक्त कार्यालयामध्ये बसणाऱ्या कामगारांसाठी थोड्याशा सुविधा मिळतात. मात्र मोल मजुरी करणाºया कामगारांकडे शासनाचे लक्ष जात नाही तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे याकडे त्यामुळे हे असंघटित कामगार मोलमजुरी करत आपल्या लहान बालकांसह दारिद्र्र्य सहन करत असतात व बालमजुरीला येथूनच सुरुवात होत असते.आज २१व्या शतकात सुद्धा मालकवर्गाकडून, भांडवलदारांकडून असंघटित मोलमजुरी करणाºया कामगारांचे फार भयानकरीत्या शोषण होत आहे आणि त्यामुळे शोषित कामगार शोषितच राहिला आणि अस्तित्वात असलेल्या अनेक चांगल्या कामगार कायद्यांचा लाभ या कामगारांना मिळू शकला नाही. किमान वेतन कायदा असूनही या कामगारांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. औद्योगिकदृष्ट्य अत्यंत सुधारलेल्या शहरात सुद्धा मालकवर्ग, भांडवलदार अजूनही या कामगारांचे शोषण करून एकाचे अनेक उद्योग उभे करून धनदांडगे, धनसंपन्न झालेले ठेकेदार व भांडवलदार आहे, पण त्यांची नजर या सामान्य कामगारांकडे गेलीच नाही.या असंघटित कामगारांसाठी सरकारने किती कायदे बनवले तरी सरकार त्यांच्या अंमलबजावणीकडे काटेकोरपणे लक्ष देत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये प्रचंड बालमजुरीला खतपाणी घातले गेले आहे. त्यामुळे शासनाने या असंघटित कामगारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणे करून बालमजुरीकडे वळालेल्या बालकांना शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल.सरकारी कामगारांना पगारी सुट्टी शिवाय वेतन भत्ता व बोनसदेखील मिळते व आमच्यासारख्या मोलमजुरी करणाºया कामगारांकडे ना ठेकेदाराचे लक्ष ना शासनाचे शिवाय आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष नाही त्यामुळे आम्हाला त्यांना आमच्यासोबत कामावर घेऊन यावे लागते. पगारात वाढही नाही, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते. असंघटित कामगारांच्या शोषण आणि पिळवणुकीविरोधात कायदे करण्यात आले.- रामदास राठोड, कामगार

टॅग्स :Nashikनाशिक