शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी नगर परिषदेच्या समिती सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 01:19 IST

नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड नगर परिषद सभागृहामध्ये बिनविरोध पार पडली. याप्रसंगी पीठासन अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्यासह मुख्याधिकारी पंकज गोसावी व नगराध्यक्ष संजय इंदुलकर उपस्थित होते .

इगतपुरी : नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची निवड नगर परिषद सभागृहामध्ये बिनविरोध पार पडली. याप्रसंगी पीठासन अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्यासह मुख्याधिकारी पंकज गोसावी व नगराध्यक्ष संजय इंदुलकर उपस्थित होते .यावेळी आरोग्य सभापती म्हणून सुनील रोकडे, नियोजन व विकास सभापतिपदी उपगराध्यक्ष नईम खान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून सीमा जाधव,

सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी नगरसेवक संपत डावखर, पाणीपुरवठा सभापतिपदी नगरसेवक गजानन कदम, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापतींचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार केला.

 

शहर विकासाला बळ देत शहराचा कायापालट करून इगतपुरीला हरित व सुंदर करण्याचा मानस यावेळी सदस्यांनी केला.

यावेळी तहसीलचे लेखा अधिकारी राजू भालेराव, स्थायी सभा अधीक्षिका मोनिका शेवाळे, नगरसेवक उमेश कस्तुरे, युवराज भोंडवे, विनोद कुलथे, नगरसेविका साबेरा पवार, अपर्णा धात्रक, उज्ज्वला जगदाळे, आरती कर्पे, गीता मेंगाळ, मीना खातळे, रोशनी परदेशी, आशा सोनवणे उपस्थित होते.

             इन्फो :

 

शहराचे व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता घनकचरा विघटन व प्रक्रिया तसेच प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण, जैविक खत प्रकल्प, सांडपाण्याचा निचरा, घंटागाडी नियोजन ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, प्रत्येक प्रभागात डास मारण्याच्या फवारण्या आदी आरोग्याच्या सोयी सुरळीत करून आरोग्याला प्रथम प्राधान्य देणार.

 

             - सुनील रोकडे, आरोग्य सभापती

 

 

टॅग्स :Nashikनाशिकnagaradhyakshaनगराध्यक्ष