शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा १९ एप्रिलपासून ;पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:45 IST

राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. मात्र राज्यातील विविध जिल्हयांमध्ये कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा वेळापत्रकात बदलराज्यातील कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सुधारीत वेळापत्रकानुसार ९ एप्रिलपासून परीक्षा होणार

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. १९ एप्रिल २०२१ पासून पुढे घेण्यात येणार असून यासंदर्भातीव सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.राज्यातील विविध जिल्हयांमध्ये कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून कोरोनाचा संसर्ग पसरु नये तसेच अनेक ठिकाणी जाहिर करण्यात आलेली टाळेबंदी व निर्बंधामुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आल्या आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते.परंतु, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, परीक्षे संदर्भातील अद्यावत माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहितीविषयी खात्री करून घेण्याचे आवाहनही डॉ. अजित पाठक यांनी केले. दरम्यान, प्रथम व द्वितीय वर्ष उन्हाळी - २०२० परीक्षांचे समचिकित्सा, आयुर्वेद, भौतिकोपचार विद्याशाखांचे निकाल प्रक्रियेचे कामकाज सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंतीम वर्ष परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेचअंतीम वर्षाच्या परीक्षा ८ मार्च २०२१ पासून सुरु असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येत आहेत. तसेच लेखी परीक्षेनंतर तत्काळ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी इंटर्नशीप करावी लागणार असून या संबधित विद्यार्थ्यी कोविड-१९ रुग्ण सेवेकरीता उपलब्ध होणार आहे- अजित पाठक , परीक्षा नियंत्रक , महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय