शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बाळ ठाकरेंच्या दातृत्वाची अनोखी कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:38 IST

शुभवर्तमान : पोलीस पाटलाने घडविले माणुसकीचे दर्शन

ठळक मुद्देबाळ ठाकरे यांनी यापूर्वी पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्यावर गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक खर्च करत आहेत.

नितीन बोरसे,सटाणा : गावात काही अनुचित घडले की, पोलिसांना तातडीने खबर पोहोचविणारा पोलीस पाटील तसा उपेक्षित घटक. त्याची कमाईही फारशी नाही. पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या या पोलीस पाटीलमधील संवेदनशील माणसाचे दर्शन घडविले आहे ते बागलाण तालुक्यातील कुपखेडाचे बाळ ठाकरे यांनी. ठाकरे आणि जायखेडयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आखतवाडे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख ११ हजार रु पयांची मदत करून दातृत्वाचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील किशोर बापू खैरनार (वय २६) या तरु ण शेतक-याने सततच्या नापिकीमुळे मृत्यूला कवटाळून आपले जीवन संपविले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळला. नेहमीप्रमाणे शाब्दीक मदतीचा मारा केला. प्रत्यक्षात कुटुंबीयाच्या हातात काहीच पडले नाही. दोन बिगा जमिनीवर गुजराण करणा-या या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती पाहून कुपखेडा येथील पोलीस पाटील व द्राक्ष बागायतदार बाळ ठाकरे यांना गहिवरून आले. त्यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा मनोमन निश्चय केला. मात्र गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष -डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा फटका ठाकरे यांनाही बसला होता. त्यामुळे ठाकरे यांना दिलेला शब्द पाळता आला नव्हता. ही बोच त्यांना होतीच. सुदैवाने यंदा द्राक्षाला चांगला भाव मिळाला आणि पहिल्याच तोडीला मिळालेल्या पैशातून एक लाख रु पयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांनी ही बाब जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना सांगितली. ठाकरे यांनी दाखविलेल्या दातृत्वाला सलाम करत गुरव यांनी देखील आपलाही खारीचा वाटा म्हणून त्यात अकरा हजार रु पयांची भर टाकली. पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील यांनी एक लाख अकरा हजार रु पयांची मदत कोणताही गाजावाजा न करता खैरनारा परिवाराला सुपूर्द केली.दातृत्वाचा निर्झरबाळ ठाकरे यांनी यापूर्वी पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्यावर गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक खर्च करत आहेत. तसेच दरमहा मिळणारे पोलीस पाटीलचे मानधन त्यांच्याकडून नामपूर येथील दोन अपंग व एका जेष्ठ नागरिकाला दिले जाते. पोलीस निरीक्षक गुरव देखील गरीब विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य दरवर्षी पुरवतात. प्रसंगी वैद्यकीय उपचारासाठी धावून येतात.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस