शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिस्टची वर्दी यांना अनोखी मानवंदना

By admin | Updated: July 10, 2017 00:41 IST

नाशिक : सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना सायकलिस्टने अंत्ययात्रेत सायकल चालवत अनोखी मानवंदना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजविणारे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना सायकलिस्टने अंत्ययात्रेत सायकल चालवत अनोखी मानवंदना दिली. रविवारी (दि. ९) नाशिक अमरधाम येथे विर्दी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शनिवारी (दि. ८) एनआरएम राइडदरम्यान नाशिक-इगतपुरी मार्गावर जसपालसिंग विर्दी यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजता विर्दी यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत नाशिक सायकलिस्टच्या ४०० हून अधिक सदस्यांनी सायकल चालवत विर्दी यांच्याप्रती श्रद्धांजली अपर्ण केली. सातपूर औद्योगिक वसाहत, आयटीआय सिग्नल, सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर लिंक रोड, इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरमार्गे नाशिक सायकलिस्टचा हिरवा टी शर्ट परिधान करून सायकलिस्ट सदस्यांनी काढलेल्या रॅलीचा अमरधाम येथे समारोप करण्यात आला. यावेळी सायकलिस्ट सदस्यांनी आपल्या टी शर्टवर ‘मिस यू जसपाल सर’ असे स्टिकर लावले होते. यावेळी जसपालसिंग विर्दी यांचा मुलगा हरजससिंग विर्दी आणि भाऊ गुरमितसिंग विर्दी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्तडॉ. रवींद्रकुमार सिंगल, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिश बैजल, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, सुहास फरांदे, महेश हिरे, रतन लथ, जनक सारडा, विक्रम सारडा यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.