Unidentified vehicle kills youth | अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक ठार

दिंडोरी : नाशिक-कळवण मार्गावरील वलखेड फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात वरखेडा येथील युवक जागीच ठार झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्रीच्या सुमारास वलखेड फाटा येथे अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक लागून बापू मनोहर गरु ड (३९) हा युवक जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेने वरखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस निरिक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हावलदार तुळशीराम जाधव , यशवंत भोये करीत आहेत.

Web Title:  Unidentified vehicle kills youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.