शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ आमदार हिरेंचा भाजपावर भरवसा नाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:07 IST

सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली.

ठळक मुद्देरविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचार सुरू भाजपा या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दईलच याचा भरवसा नाही

नाशिक : विधानसभा व लोकसभा निवडणुकीला अजुन दिड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना भाजपा समर्थक आमदार अपुर्व हिरे यांना मात्र भाजपा या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दईलच याचा भरवसा नसल्याने की काय त्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवसांपुर्वी आपल्याच सरकारच्या विरोधात भुजबळ समर्थकांनी केलेल्या आंदोलनाला स्वयंस्फुर्तीने कार्यकर्त्यांनिशी हजेरी लावल्यानंतर हिरे यांनी आता रविवारच्या मुहूर्तावर निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्या राजकीय भुमिकेवर सा-यांचेच लक्ष लागून आहे.स्वत: हिरे यांनीच आपल्यातील अस्वस्थता निवडक पत्रकारांसमोर व्यक्त करतांना होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाने आपल्याला उमदेवारी दिली तर बरेच नाहीतर निवडणुक तर लढवणारच असे एकतर्फी जाहीर करताना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची ते ऐनवेळी जाहीर करू असे सांगून त्याबाबतचे गुढ कायम ठेवले आहे. सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली. नाशिक जिल्ह्यात एकेकाळी हिरे घराण्याचे असलेल्या राजकीय वर्चस्वाचा भाजपाला फायदा होईल असे मानले जात असताना, प्रत्यक्षात भाजपाकडून मात्र हिरे बंधूंना मानसन्मान मिळत नसल्याच्या त्यांच्या समर्थकांच्या भावना आहेत. त्यातूनच आगामी काळातही अपुर्व हिरे यांना पक्षाकडून मंत्री वा महामंडळ मिळेल अशी आता खात्री दिसत नसल्यामुळेच की काय गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा भाजपाशी दुरावा वाढत चालला असून, त्यातूनच त्यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयात लावलेल्या भाजपा नेत्यांच्या तस्वीरीही अडगळीत टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीची एक प्रकारे माहितीच त्यांनी पत्रकारांसमोर उघड केली. रविवारी नाशिकच्या श्री कालिका मंदिराचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याचे आमदार हिरे यांनी जाहीर केले आहे, मात्र आपल्या आमदारकीचे अजुन सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, अद्याप भाजपा आपण सोडलेली नाही. परंतु प्रचार करतांना भाजपाच्या नावाने नव्हे तर हिरे कुटुंबियांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाच्या नावेच करण्यात येणार असल्याचे सांगून हिरे यांनी गुढ कायम ठेवले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक