शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 23:14 IST

गिरणारे वनपरिमंडळातील वडगाव शिवारात निंबेकर यांच्या मळ्याजवळ असलेल्या घरातून पडवीत शिवन्या आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला.

ठळक मुद्दे गिरणारेजवळील वाडगावमध्ये घडली दुर्घटना

नाशिक : वन्यजीव सप्ताहच्या पुर्वसंध्येला नाशिक वनपरिक्षेत्रातील गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास घराच्या पडवीबाहेर शिवन्या बाळु निंबेकर या मुलीवर बिबट्याने अचानकपणे झडप घेतली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने कुटुंबियांनी तिला तत्काळ जिल्हा शासकिय रुग्णालात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापुर्वीच तीचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

गिरणारे वनपरिमंडळातील वाडगाव शिवारात निंबेकर यांच्या मळ्याजवळ असलेल्या घरातून पडवीत शिवन्या आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली असता ती जखमी अवस्थेत आढळून आली. तत्काळ बालिकेला रुग्णालयात हलविले; मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. घटनास्थळालगत रात्रीच तत्काळ पिंजरा लावण्यात आला असून रात्रभर या परिसरात वनकर्मचाऱ्यांचे गस्ती पथकाकडून पेट्रोलिंग केली जात होती. वनविभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासकिय नियमानुसार आर्थिक मदत कुटुंबियांना दिली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याforest departmentवनविभागDeathमृत्यू