शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

अंबोली शाळेस युनेस्कोचे सदस्यत्व बहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 9:55 PM

त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युनेस्कोचे सदस्यत्व मिळवणारी पहीली शाळा हा बहुमान मिळाला आहे.

ठळक मुद्दे विविध आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करण्याची संधी यामार्फत मिळणार

त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युनेस्कोचे सदस्यत्व मिळवणारी पहीली शाळा हा बहुमान मिळाला आहे.युनेस्को संकुलाचे आंतरराष्ट्रीय जनरल सेक्र ेटरी धीरेंद्र भटनागर यांनी शाळेला सदस्यत्व बहाल केले. शाळा उच्च प्राथमिक शाळेत एकूण ८ शिक्षक कार्यरत असून ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी सामान्य कुटूंबातील आहेत. सर्व प्रवर्गातील विद्यार्थी या शाळेत शिकतात. शाळेचे उपक्र मशिल शिक्षक जयेशकुमार कापडणीस व इतर सर्व शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नाने शाळेत नवनविन उपक्र म राबविले जातात.या युनेस्कोच्या सदस्यत्वाने शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा जडला गेला आहे.शाळेचा विकास, गुणवत्तेचा ध्यास घेतलेले हे शिक्षक असल्यामुळे अजून त्यांच्या उपक्र मशिलतेला यामुळे वाव मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्येरराष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी. तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांची जाणिव व्हावी. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राथमिक शिक्षण व त्यावरील विविध प्रयोग याबाबतचे आदान प्रदान व्हावे हा या मागील उद्देश असून विविध आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करण्याची संधी यामार्फत मिळणार आहे.क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युनेस्कोच्या कल्चरल एक्सचेंज व स्टडी टूर कार्यक्र मांतर्गत दूसऱ्या देशात जावून आपली संस्कृती, कला सादर करण्याची व इतर देशातील संस्कृती अनुभवण्याची तसेच आंतरराष्ट्रीय काँन्फरन्स व स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वैशाली वीर गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाठ, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण, केंद्रप्रमुख जयश्री पाटील व मुख्याध्यापक सरला मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या युनेस्को सदस्यत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावचे पोलीस पाटील व पालकवर्गाने स्वागत केले आहे.डिजिटल तंत्रज्ञान तसेच ज्ञानरचनावाद सारख्या विविध प्रणालींचा वापर करून जिल्हा परीषद शिक्षक जीव ओतुन काम करत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पटाचा आलेख वाढतोय. अनेक साहित्यांचा अध्यापनात वापर करून त्याची तंत्रज्ञानशी सांगड घातली जातेय. यामुळे शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्र मांत सहभागी कसे होतील यासाठी प्रयत्नशील राहू.- जयेशकुमार कापडणीस, शिक्षक.या अगोदर शाळेने अनेक नवोपक्र म राबवून शाळेचा नावलौकीक वाढवला आहे. विद्यार्थी विविध स्तरावर पुढे जावेत यासाठी शाळा, सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. या सदस्यत्वामुळे अंबोली केंद्र शाळेला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. याचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी उपयोग होईल.- जयश्री पाटील, केंद्रप्रमुख.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा