वाहने उचलल्याने नागरिक परेशान
नाशिक : शहरात नो पार्किंग परिसरातून वाहने उचलली जाऊ लागल्याने नागरिक परेशान झाले आहेत. आता कुठे कामधंद्याला सुरुवात होऊ लागलेली असताना काम बाजूला राहून गाडी उचलली जात असल्याने त्यामागे धावावे लागत असल्याबाबत नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
---
शरणपूर रोडवर जांभूळ विक्रेत्यांची रांग
नाशिक : शरणपूर रोड परिसरात सध्या जांभूळ विक्रेत्यांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यावरच थांबून जांभळे खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांनादेखील मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
----
चाट भांडारचा व्यवसाय थंडच
नाशिक : काही व्यवसाय हे प्रामुख्याने सायंकाळच्या वेळीच गर्दी होणारे असतात. मात्र, व्यवसायांवरील निर्बंधात सूट दिल्याने काही व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागले आहेत. मात्र, सायंकाळी चारपर्यंतचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे चाट भांडार हेच ज्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत, त्यांचे व्यवसाय थंडच पडलेले आहेत.
----
फणसाच्या गरे विक्रेत्यांमध्ये वाढ
नाशिक : फणसाचा हंगाम असल्याने मात्र शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत नियमित येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे फणसाच्या गरे विक्रेत्यांनी कॉलन्या आणि गल्ल्यांमध्ये हातगाडीवरून गरे विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शहरात सध्या सर्वत्र फणसाचे गरे विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे.