शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजनेचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे.

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे. मुख्य रस्ता फोडून भूमिगत गटारीचे पाइप टाकण्यात आले. मात्र उर्वरित काम मंजूर नसल्याने फोडलेल्या रस्त्यावर दिवसभर धूळ उडत असल्याने परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  देवळाली छावणी परिषद हद्दीतील आठही वॉर्डांमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. छावणी प्रशासन, नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव व नियोजनशून्य कारभारामुळे भूमिगत गटार योजनेचे काम रखडले असून, अर्धवट स्थितीत आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील लॅमरोडलगत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर मुख्य रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी मधोमध खोदाई करून पाइप टाकण्यात आले होते. त्यानंतर पावसाळ्यात रस्ता खोदाईमुळे सर्वत्र चिखल साचत असल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. यामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त झाले होते.श्वसनाच्या  आजाराची शक्यताश्री महालक्ष्मी मंदिर रस्ता वर्षभरापासून भूमिगत गटारीच्या अर्धवट कामामुळे फोडून ठेवला आहे. यामुळे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. छोटी-मोठी वाहने गेल्यास जास्त प्रमाणात धूळ उडते. या धुळीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून, त्यांना श्वसनाच्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे. तोंडावर पावसाळा येऊन ठेपल्याने रहिवाशांमध्ये येण्या-जाण्याबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक