शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जायखेड्यात रस्त्यावर फिरणाऱ्यांना समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:11 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जायखेड्यासह परिसरातील अनेक गावात लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताच जायखेड्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच बंद होईल या भीतीने नागरिकांनी किराणा माल खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली होती.

जायखेडा : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जायखेड्यासह परिसरातील अनेक गावात लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताच जायखेड्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच बंद होईल या भीतीने नागरिकांनी किराणा माल खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली होती. मात्र यानंतर अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू दिसल्याने हा गैरसमज दूर झाला. अन्य व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवल्याने आजही सर्वत्र शुकशुकाट होता. दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणाºया काही दुकानदारांवर जायखेडा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर जमावबंदी असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांना समज देण्यात आली आहे. कुल्फी, आइस्क्र ीम व शीतपेये विक्र ी करणाºया काही किराणा दुकानदारांवर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी कारवाई करीत माल जप्त केला. तर चढ्याभावाने किराणा माल विकणाºया दुकानदारांना ग्रामपंचायतकडून कडक ताकीद देण्यात आली.प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन सरपंच शांताराम अहिरे यांनी केले.नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य ओळखून सर्वांनी नियमांचे पालन करावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जायखेडा येथील मस्जिद बंद करण्यात आली असून, मुस्लीम समाजानेही मस्जिदीत नमाज न पढण्याचा निर्णय घेतला आहे, तर जुम्मा नमाजही घरीच करावी, असे आवाहन मुस्लीम पंच कमिटीने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस