शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:07 IST

कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देफसवणूक : एजंटासह दहा व्यक्तींवर गुन्हा

नाशिक : कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध क रून देण्याच्या आमिषाने एका मध्यस्थासह दहा व्यक्तींना सुमारे पावणेतीन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल बजिराणी (रा. अंधेरी, मुंबई) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रानू सुनील पाटील (रा. डीजीपीनगर-२) यांनी तक्र ार दाखल केली आहे. तक्रारीनुसार बजिराणी याने पाटील यांना त्याच्या ग्लोबल ट्रस्ट सर्व्हिसेस या फायनान्स कंपनीत नोकरी दिल्याचे भासविले. तसेच त्यांना कमी व्याजदारात कर्जवितरण करण्याचे आमिष दाखवून गरजू कर्जदारांना जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी अशा इच्छुकांची बजिराणीसोबत भेट घालूनदिली. संशयितांनी सर्वांकडून कर्ज प्रकरण प्रोसेसिंग फी तसेच इतर कारणे देत आठ हजार ते ७० हजारांपर्यंतची रक्कम घेतली. अशा एकूण दहा इच्छुकांकडून सुमारे २ लाख ८३ हजार ७५० रुपयांची रक्कम गोळाकेली. पंरतु कोणालाही कर्ज दिले नाही. अनेक या संदर्भात तपास करण्याचा प्रयत्न केला असता कुणालाही कर्ज उपलब्ध झाले नसल्याचे लक्षात आले.यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील व इतर गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. बी. बाकले करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी