जळगाव नेऊर : यावर्षी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सुरक्षीत अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे.गणपती उत्सवानंतर कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असुन, घरातील मृत व्यक्तीना पंधरवड्यात त्यांच्या मृत्युच्या दिवसाच्या तिथीचा अभ्यास करून पितृपंधरवड्यातील तिथी निवडली जाते. एकंदरीत मृत व्यक्तीच्या मृत्यू समयीच्या घटीकेचा विचार करून पितरांचा विधी त्या त्या तिथीला करायचा असतो. पितरांच्या दिवशी कावळ्याला विशेष महत्व असते.मनुष्य धाव धाव धावतो, काबाड कष्ट करतो, जमवलेल्या धनसंचयातुन स्वर्गवासी वाड वडीलांचेही काही घेणे असते, नाही तर पुढे याच व्यक्ती कडून कुटुंबाना त्रास होतो, अशी श्रद्धा आहे आपल्या पितरांचा सकारात्मक आशिर्वाद मिळावा म्हणून करावयाचा विधी म्हणजे पितरं होय. पुर्वी पितरांसाठी नातलग, गावातील व्यक्ती, शेजारील व्यक्तींना विशेष करून बोलविले जात होते, मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सुरक्षीत अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे.कावळे आणि नैवेद्य..पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्व असते, अनेक वेळा कावळे नैवेद्य घेतात, तर काहींचे घेत नाही, त्यामुळे वाड- वडील नाराज असल्याचे भावना निर्माण होते, तर त्यामुळे कावळ्यांना विशेष महत्व असते.वृक्षतोडीमुळे पशुपक्ष्यांचे निवारे नष्टभरमसाठ झालेली वृक्ष तोड व वाढलेल्या शहरीकरणामुळे पशु पक्ष्यांचे निवारेच नष्ट होत चाललेले आहेत. पर्यायाने अनेक पशु पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.पितरांप्रती असणारी श्रद्धा आपल्याला हेच सांगते आहे कि कावळा प्रती मयत वाड वडील व्यक्ती सुध्दा पशु पक्ष्यांना जिवंत ठेवा, त्यांना जतन करा, त्यांना जतन करण्यासाठी निवारास्थाने जपा, वाढवा, लागवड करा, संवर्धन करा. हेच सांगते.
पितृपक्ष पंधरवाडा कोरोनाच्या सावटाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:55 IST
जळगाव नेऊर : यावर्षी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सुरक्षीत अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे. गणपती उत्सवानंतर कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असुन, घरातील मृत व्यक्तीना पंधरवड्यात त्यांच्या मृत्युच्या दिवसाच्या तिथीचा अभ्यास करून पितृपंधरवड्यातील तिथी निवडली जाते. एकंदरीत मृत व्यक्तीच्या मृत्यू समयीच्या घटीकेचा विचार करून पितरांचा विधी त्या त्या तिथीला करायचा असतो. पितरांच्या दिवशी कावळ्याला विशेष महत्व असते.
पितृपक्ष पंधरवाडा कोरोनाच्या सावटाखाली
ठळक मुद्देसुरक्षीत अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत विधी