शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येताना काकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:09 IST

दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे.

ठळक मुद्देअपघात : डंपरला दुचाकीची पाठीमागून धडक

दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे.वणी येथील राज मेन्स पार्लरचे संचालक व वणी नाभिक समाज मंडळाचे कार्यकर्ते गुलाब नामदेव चित्ते ( वय ४५) हे पुतणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी कुटुंबासह नाशिकला गेले होते. दुपारी सर्व खरेदी झाल्यानंतर गुलाब चित्ते यांनी थंडी जास्त असल्याने पत्नी व तीन लहान मुलांना काळी- पिवळी टॅक्सीमध्ये बसवून ते एकटेच आपल्या दुचाकीने वणी येथे निघाले. नाशिक - वणी रस्त्यावरील दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाजवळ बुधवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुढे असलेल्या डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना डंपरला पाठीमागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गुलाब चित्ते यांना तीन मुली व २ वर्षांचा मुलगा आहे. नाभिक समाज मंडळाच्या विविध उपक्रम व कार्यक्रमात तसेच मार्कंडेय पर्वत येथील रंगनाथबाबा आश्रमाच्या कार्यक्रमात गुलाब चित्ते यांचा हिरिरीने सहभाग असे. पुतणीचे सहा जानेवारीला लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण व लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना गुलाब चित्ते यांचा अपघातीमृत्यू झाल्याने वणी परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू