जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो, कांद्यासह इतर शेतमालाची बाजारपेठ असल्याने परराज्यातूनही हजारो व्यापारी व कामगार व्यवसायासाठी या परिसराला प्राधान्य देतात. येथील काही व्यावसायिकांकडून चौकाचौकात अनधिकृत टपऱ्या थाटून रस्ते ब्लॉक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय भाजीपाला विक्रेत्यांचे दररोज वाहनचालकांशी वाद देखील होत आहेत. सदर अपघात व वाद टाळण्यासाठी याठिकाणी रस्त्यावर थाटलेली अनधिकृत दुकाने तातडीने बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती पी. एन. जी. प्रशासन, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे आणि ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, शाखाध्यक्ष राजेंद्र तिडके,उपाध्यक्ष भगवान कांबळे,सरचिटणीस रामदास शेवरे, मुकुंद शिंदे, दिलावर पिंजारी, बाळू गांगुर्डे, प्रकाश बागुल, सोमनाथ विधाते, मनोज हिरे, साहेबराव बैरागी, रवींद्र शेवरे, गणेश हिरे ,त्र्यंबक काळे, किरण शिंगाडे, पप्पू वडजे, संतोष शेळके आदी उपस्थित होते.
वणी चौफुलीवर अनधिकृत दुकानांमुळे वाहतुकीला अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 15:29 IST
पिंपळगाव बसवंत : येथील वणी चौफुलीवर भाजीपाला विक्री व अनधिकृत दुकाने थाटल्यामुळे वाहतूकीला अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी या परिसरात वाहने चालविताना करावी लागणारी कसरत आणि अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता याठिकाणची अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागणी शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वणी चौफुलीवर अनधिकृत दुकानांमुळे वाहतुकीला अडथळे
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शिव वाहतूक सेनेकडून निवेदन