शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:39 IST

वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे

इंदिरानगर : वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तरीही महावितरण कंपनी ठोस पाऊल उचलत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.वडाळागाव व परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर याच परिसरात लोकवस्ती अधिक वाढत आहे. त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे ४०च्या घरात गेली आहे.या अनधिकृत भंगार गुदाममध्ये शहरातून गोळा केलेले प्लॅस्टिक वितळणे, पत्रे लोखंडी कटिंग करणे यासह विविध कामासाठी विद्युत पुरवठा लागतो. परंतु काही भंगार गुदाम मालकांनी जसे अनधिकृत भंगार गुदामे आहेत तसेच अनधिकृतपणे जमिनीखालून विद्युत पुरवठा घेतला आहे. त्यामुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत असून, त्यामुळे लाखो रुपयांचे वीज बिल मिळत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.नागरिकांमध्ये संतापसुमारे वीस दिवसांपूर्वी महावितरणच्या भरारी पथकाने दोन भंगार गुदाममालकांवर अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच लाखो रु पयांचा दंड केला. महावितरण कंपनीचे भरारी पथक कारवाई करतील, परंतु परिसरातील महावितरण कंपनीचे कक्ष कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बघायची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक