शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:23 IST

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कोरड्या पाटाचा दुरुपयोग होत असल्याने सुमारे दहा वर्षांपूर्वी याठिकाणी मनपाने लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार केला. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्रमांक एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर, डीजीपीनगर क्र मांक एक, विनयनगर यांसह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ व संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते, परंतु साईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने याठिकाणी जिल्ह्यातून, विविध शहरातून व गावातून परीक्षेसाठी विद्यार्थी येत असतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच चारचाकी आणि दुचाकी लावतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. तसेच फेरफटका मारण्यास येणाऱ्या आबालवृद्धांनाही या अनधिकृत वाहनतळाचा त्रास होत आहे. तसेच काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.तातडीने दखल घ्यावीसाईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. जॉगिंग ट्रॅकची वाहनतळ आणि स्मोकिंग झोन म्हणून नवीन ओळख निर्माण होत चालली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग