शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्याने शेवग्याच्या झाडांवर फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:16 IST

लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला.

ठळक मुद्देउत्पन्न फारच कमी प्रमाणात मिळाले.

लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला.ठेंगोडा येथील शेतकरी अनंत नथु शेवाळे यांनी आपल्या मालकीच्या (गट नंबर १४९) शेतात गेल्या वर्षी एक एकर क्षेत्रात मोठ्या अपेक्षेने शेवग्याची लागण केली होती; मात्र वातावरणात वारंवार बदल घडून आल्याने व बेमोसमी पावसाने मनमुराद हजेरी लावली, त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने उत्पन्न फारच कमी प्रमाणात मिळाले.मात्र यावर्षाची कसर पुढील वर्षी भरून निघेल, या अपेक्षेने या वर्षीही वातावरणात वेळोवेळी बदल घडून आला व गत महिन्यात मोठी धुक्याची लाट आल्यामुळे उत्पादन न मिळाल्याने शेवाळे यांचे दोन वर्षात सुमारे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.                 शेवगा हा वर्षांतून दोन वेळा आर्थिक उत्पादन मिळवून देत असतो. यामुळे शेतकऱ्यांना या पीक लागवडीसाठी आस्था निर्माण झाली आहे. वर्षातून साधारण पाच ते सहा टन शेवग्याचे उत्पादन होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (एक्स्पोर्ट) ४५ ते ९० रुपये प्रति किलो तर स्थानिक पातळीवर ६० ते ७० रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री होत असते.          फेब्रुवारी महिन्यापर्यंत एक्सपोर्ट मार्केटमध्ये शेवग्याची खरेदी सुरू असते. त्यानंतर एक्सपोर्ट मार्केट बंद होते. नैसर्गिक आपत्ती व वातावरणात वेळोवेळी होणारे बदल यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. अनंत शेवाळे यांनी वर्षाला दोन लाख रुपयांचा खर्च केला होता; मात्र उत्पादन खर्चही न निघाल्याने हताश होऊन अखेर त्यांनी एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या शेवगा पिकावर रोटर फिरवला. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी