शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सर्वसामान्यांना फटका! पेट्रोलच्या भडक्याने छत्री, रेनकोटवर महागाईचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:50 IST

नाशिक - वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची पावले बाजारपेठेकडे वळू ...

नाशिक - वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत किमतीत २५ टक्के वाढ झाल्याने पावसापासून संरक्षण करणाऱ्या या वस्तू सामान्यांना महागाईचे चटके देत आहेत. या वस्तूंसाठी लागणारे पॉलिस्टर कापड पेट्रोलियम संबधित उत्पादन आहे. गत वर्षभरात पेट्रोलच्या किमतीचा भडका आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे पॉलिस्टर महागले आहे. त्यातच या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याने आयातीवर देखील परिणाम झाला आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला पावसाळी खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिकही उन्हाळी उत्पादने बाजूला करून छत्री, रेनकोट, जुन्या घरांच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री, पावसाळी चप्पल अशा विविध वस्तू पुढे आणतात. महामारी काळात गत दोन वर्षे या बाजारात काहीसी मंदी होती. यंदा मात्र २० ते २५ टक्क्यांनी किमती वाढून महागाईचा भडका उडाला आहे.

विशेषता छत्र्यांचे दर २५ टक्के महागल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. छत्रीसाठी पॉलिस्टर कापड लागते. हे कापड पेट्रोलियम उत्पादनांशी संबंधित आहे. गत दीड-दोन वर्षांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर तब्बल ३० ते ४० रुपये महागले आहे. त्याचा परिणाम साहजिकच संबंधित वस्तूंवर देखील झाला आहे. त्यातच स्टीलचे दर वाढल्याने छत्रीसाठी लागणाऱ्या काड्यांच्या खर्चात देखील भर पडली आहे. वाहतूक आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. कच्च्या मालापासून ते कामगारांपर्यंतचा खर्च वाढल्याने छत्री बाजाराला महागाईच्या झळा बसत आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व त्याचबरोबर मुंबई, उल्हासनगर, लुधियाना या ठिकाणांहून छत्र्यांची आवक होते. छत्रीबरोबरच रेनकोटवरचे दरही २० टक्क्यांहून महागले आहेत. रेनकोटच्या कच्चा मालाची महागाई आणि वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिक सांगतात.

छत्र्यांचे दर

मागील वर्षीचे            दर                    यंदाचे दर

पारंपरिक छत्री     २०० ते २५०          २५० त ३००

फोल्डिंग छत्री        २५०                         ३००

बेबी अम्बेला         १२० ते १५०           २०० ते २५०

गार्डन अम्बेला     ७०० ते २०००         १००० ते २००० 

चीनमधील लॉकडाऊनमुळे नाविन्यतेला ब्रेक

छत्री, रेनकोट व प्लास्टिक सीटचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. भारतीय उत्पादनांच्या तुलनेत चिनी वस्तू ग्राहकांचे लक्ष पटकन वेधून घेतात. तसेच चीन वस्तूंमध्ये दरवर्षी नावीन्य असते. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागले आहे. त्यामुळे आयातीवर परिणाम झाला असून, परिणामी छत्री आणि रेनकोटच्या बाजारात यंदा फारसे नावीन्य नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

पावसाळा तोंडावर असल्याने जुन्या घरांच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक आणि ताडपत्री सीटची मागणी वाढली आहे. प्लास्टिकदेखील पेट्रोलियम संबंधित उत्पादन असल्याने गत वर्षीच्या तुलनेत ते ३० टक्के महागले आहे. प्रतिकिलो, चौरस मीटर आणि सीटनुसार त्याची विक्री होते.

- भरत पाटील, ताडपत्री व्यावसायिक

नागरिकांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून मागणी सुरू झाली आहे. मात्र, दरात २० ते २५ टक्के वाढ झाल्याने एकाच वेळी बुकिंग करण्यापेक्षा व्यावसायिक टप्प्याटप्प्याने बुकिंग करत आहे. ग्रामीण भागात १२ व १६ काडी पारंपरिक छत्रीला, तर शहरी भागात फोल्डिंगच्या आणि बेबी अम्बेलाला पंसती मिळत आहे.

- रमेश छत्रीशा, छत्री व्यवसायिक 

 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलRainपाऊस