शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
5
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
6
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
7
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
8
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
9
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
10
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
11
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
12
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
13
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
14
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
15
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!
16
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
17
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
18
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
19
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
20
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...

उमरझरी मध्यम प्रकल्पातूनही सिंचनाची समस्या कायम

By admin | Updated: May 3, 2017 01:08 IST

तालुक्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी मध्यम प्रकल्पाची ओळख आहे.

नाशिक : रविवारी जिल्ह्यातील बहुतांशी भागाला वादळीवारा व गारपिटीने झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने सुमारे पाचशेहून अधिक हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने व्यक्त केला असून, गेल्या दोन दिवसांपासून तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून शेतपिकांचे पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. निफाड व इगतपुरी या दोन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामानातील बदल व गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे रविवारी अचानक अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वारा, विजेचा कडकडाट करीत गारांसह कोसळलेल्या या पावसामुळे थेट जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक व खळ्यात साठवून ठेवलेला माल या पावसात पूर्णपणे नष्ट झाला आहे. वाऱ्यांमुळे द्राक्षबागा कोसळल्या तर काढणीवर आलेले द्राक्षे जमिनीवर गळून पडले. कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची या नगदी पिकांनाही जोरदार फटका बसला आहे. या नुकसानीची दखल घेत सोमवारी महसूल खात्याने पीक पंचनाम्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहायकांना दिले असता प्रथमदर्शनी सुमारे पाचशे हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे निफाड व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी सुमारे ३३ टक्के पिके उद्ध्वस्त झाली आहेत. निफाड तालुक्यात ६९ हेक्टरवरील द्राक्ष, ७८ हेक्टरवरील कांदा व ९० हेक्टरवरील भाजीपाला असे सुमारे २३७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर इगतपुरी तालुक्यात २० हेक्टरवरील भाजीपाला, १० हेक्टर मका व ३० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यात ५१ हेक्टर कांदा, ३५ हेक्टर मिरची, ६७ हेक्टर टोमॅटो असे एकूण १७७ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. भिंत कोसळली; जनावरे दगावलीविजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील मौजे झिरे पिंपरे येथील एकनाथ यशवंत शिरसाठ हे जखमी झाले, तर यशवंत रामा सोनवणे यांच्या चार शेळ्या दगावल्या आहेत. झिरे पिंपळ येथे पावसामुळे भिंत कोसळून प्रमिला अहेर, कुणाल अहेर, कल्याणी अहेर, माऊ अहेर हे चौघे जण जखमी झाले तर असाच प्रकार देवळा शिवारात घडून माधुरी पवार, सीमा सचिन जाधव या दोन महिला जखमी झाल्या आहेत.