नाशिक- निफाड तालुक्यातील ओझर व पिंपरी या दोन्ही गावांपासून जवळ असणारे उमाजीनगर गाव अद्यापही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. स्वातंत्र्य मिळवून इतकी र्व झाली तरी अद्याप गावाची हद्द निश्चित नसल्याने येथील गावकºयांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही. गावात ५०० ते ६०० च्या दरम्यान आदिवासी बांधव आहेत. जन्म, मृत्य, विवाहनोंदणी अशा अनेक बाबतीत या लोकांना कागदपत्रे मिळवताना मोठ्या अडचणी येत आहे. गावात अद्याप वीज नाही, पाणी नाही, त्यामुळे सायंकाळनंतर गावात अंधाराचे साम्राज्य पहायला मिळते. सध्या १०, १२वीच्या परीक्षा चालू आहेत मात्र विद्यार्थ्यांना कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. गावात अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे गावकºयांना आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे. शासकीय पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे गावकºयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पंचवार्षिक निवडणुकीपुर्वी आमदारकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने गावात वीज देण्याचे आश्वासन दिले. विजेचे पोलही उभे केले. निवडणूक संपताच पोल काढून नेले. जन्म, मृत्यूसारख्या मुलभूत दाखल्यांसाठीही गावकºयांना वणवण करावी लागत आहे. गावाची हद्द निश्चित करुन गावकºयांना मुलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील काशीनाथ वळवी, सुनिल गांगोडे, मंदाबाई पवार, गोपाल वळवी, सुमन बरफ आदिंनी केली आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीपासून अद्यापही उमाजीनगर गाव मुलभूत सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 12:57 IST
अद्याप गावाची हद्द निश्चित नसल्याने येथील गावकºयांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही.
स्वातंत्र्य प्राप्तीपासून अद्यापही उमाजीनगर गाव मुलभूत सुविधांपासून वंचित
ठळक मुद्देअद्याप गावाची हद्द निश्चित नसल्याने येथील गावकºयांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही. गावकºयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे