शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागून दोन युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:22 IST

मेशी : येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. ...

ठळक मुद्देमेशीमधील घटना : सुदैवाने एक जण बचावला

मेशी : येथील दोन युवा शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. या दोघा युवकांच्या मदतीसाठी गेलेला तिसरा युवक सुदैवाने बचावला. दरम्यान, मृत दोघा युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील विजेचा पंप सुरू करण्यासाठी तरुण शेतकरी संदीप नानाजी शिरसाठ (३१) गेला. मोटरच्या लोखंडी पेटीत वीजप्रवाह उतरला असल्याने संदीप लोखंडी पेटीला लटकला. तो मदतीसाठी आरडाओरडा करीत असल्याचे बघून थोड्याच अंतरावर मका पिकाला पाणी देत असलेला भूषण ऊर्फमनोज रमेश शिरसाठ (२३) हा मदतीला धावून गेला असता तोही पेटीला लटकला. दोघांची मदतीसाठी धडपड पाहून जवळच असलेला कृष्णा उत्तम शिरसाठ हा देखील त्यांच्या मदतीला गेला असता तोसुद्धा त्यांना लटकला; पण सुदैवाने तो शॉक लागताच बाजूला फेकला गेला. त्यामुळे तो बचावला.या घडलेल्या प्रकारात संदीप शिरसाठ व भूषण शिरसाठ यांना गावातील व आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ रु ग्णवाहिका बोलावून देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. आमदार डॉ. राहुल आहेर आणि संभाजी आहेर यांनीही रुग्णालयात धाव घेतली. मात्र, संदीप आणि भूषण यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. डॉक्टरांनी संदीप आणि भूषण यांना मृत घोषित केले तर जखमी झालेल्या कृष्णा शिरसाठ यांना मालेगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर, वाघमारे, हवालदार धोक्र ट, गायकवाड हे करीत आहेत.गावावर शोककळासंदीप शिरसाठ यांचा गेल्या आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अतिशय गरीब परिस्थितीत कष्ट करून संदीप आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संदीप शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे, तर भूषण शिरसाठ हा एकुलता एक होता. देवळा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या दुर्घटनेमुळे मेशी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी मेशी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू