शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडून चोरटे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 17:11 IST

पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच असून, पोलिसांना सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यास अपयश येत आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त संशयितांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच असून, पोलिसांना सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यास अपयश येत आहे. इंदिरानगर, म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन लंपास केल्या.पाथर्डी फाटा येथील माउलीनगर येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातून सुमारे ४८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बळजबरीने ओढून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्चना कैलास धोंडगे (४२, रा. लक्ष्मीनारायण हाईट्स समर्थनगर) या त्यांची मैत्रीण निकिता पंत यांच्याबरोबर मंगळवारी (दि.१६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माउलीनगर येथून पायी घरी जात होत्या. यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव वेगात येऊन धोंडगे यांच्या गळ्यात असलेली १६ ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी धोंडगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात उज्ज्वला संतोष कोळी यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कलानगरच्या मधुबन बंगल्याच्या परिसरातील रहिवासी उज्ज्वला या रविवारी सायंकाळी त्यांच्या मैत्रीण राधा अग्रहरी यांच्यासमवेत म्हसरूळ येथील कलानगर ते रामेश्वरनगर दरम्यान फेरफटका मारत असताना वाघाडी पुलाजवळ अजिंक्यतारा सोसायटी रस्त्यासमोर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने कोळी यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सदर घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा परिसरात सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडल्याने म्हसरूळ पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.---

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी