शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरी करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:52 IST

येवला : तालुका परिसरात दुचाकी चोरी करणारे दोघे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

येवला : तालुका परिसरात दुचाकी चोरी करणारे दोघे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित येवला येथे येणार होते. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. त्यात संशयित अशोक हरिभाऊ बनोटे (५०, मूळ रा. कोतुळ, ता. अकोला, जि. अहमदनगर व हल्ली रा. गोंडेगाव ता. अकोला) व गौतम भाऊराव पारखे (२८, रा. पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना हिरो स्प्लेण्डर प्रो. मोटारसायकलबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मोटारसायकल येवला शहर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी येवला तालुका व अहमदनगर जिल्ह्यात आणखी मोटरसायकल चोरी केल्याचेही पोलिसांना सांगितले. अशोक बनोटे याने त्याच्या ताब्यातील चोरी केलेली एक स्प्लेंडरप्रो ही गौतम पारखेस विनाकादगपत्राची पाच हजार रु पये किमतीस विकल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून तीन हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्रो व एक हिरो कंपनीची पॅशन प्रो अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अशोक बनोटे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात घरफोडी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के. के. पाटील, एस. आर. कोळी, हवालदार शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, विशाल आव्हाड, हेमंत गिलिबले, इम्रान पटेल, निर्मळ यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे