शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील कामटवाडे येथे दुचाकी जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:28 IST

सिडको : येथील कामटवाडे भागात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली दुचाकी ...

सिडको : येथील कामटवाडे भागात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली दुचाकी जाळली. सिडको भागात दुचाकी जाळपोळीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. दुजाकी जाळणाऱ्या एकास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिडकोसह परिसरात समाजकंटकांकडून दुचाकी जाळण्याचे प्रकार कायम घडत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार थांबले होते. परंतु मंगळवारपासून पुन्हा दुचाकी जाळपोळ झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कामटवाडे येथील भाग्यश्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये मागील भांडणाची कुरापत काढत सोसायटीच्या शेजारीच राहणाºया देवकन तायडे याने जस्बीर कौर सिंधू यांच्या मालकीची एव्हिटर होंडा दुचाकी (क्रमांक एमएच १५ डीबी - ४०५०) वर रॉकेल टाकून पेटवून दिली. यात संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली असून या दुचाकीच्या जवळच असलेल्या आशिष कनोजिया यांची दुचाकी क्रमांक एमएच-१५ डीडब्यू-६३८६ तसेच सुनील हुदलीकर यांची दुचाकी (क्रमांक एमएच-१५ डीएक्स-४१८९) चेही नुकसान झाले आहे. अंबड पोलिसांनी दुचाकी जाळल्या प्रकरणी देवकन तायडे (रा. कामटवाडे) याला ताब्यात घेतले आहे.संशयित देवकन तायडे याचे भाग्यश्री सोसायटीत शॉप असून, त्याने ते शॉप भाड्याने दिले आहे. त्याच्या शॉपवर येणाºया व्यक्ती या सोसायटीत असलेल्या शौचालयाचा वापर करतात. परंतु सोसायटीच्या निमयामनुसार शॉपमालकाने मेंटेनन्स देणे बंधकारक असताना तायडे मेंन्टेनंन्स देत नसून दादागिरीची भाषा करत असल्याच्या कारणावरून शनिवारी, दि.१० आॅगस्ट रोजी सोसाटीतील नागरिक व तायडे यांच्यात वाद झाला होता. सोसायटीतील नागरिकांनी तायडे यांच्या विरोधात अंबड पोलिसांना अर्ज दिल्याने तायडे यांना पोलिसांनी समज दिली होती. परंतु यानंतर तायडे यांनी याच गोेष्टीचा राग धरत सोसायटीतील दुचाकी जाळल्याने जस्बीर सिंधू, अशिष कनोजिया व सुनील हुदलीकर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी