सटाणा : देवळा रस्त्यावरील तुरकीहुडी नजीक दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात येथील छायाचित्रकार योगेश दादाजी पवार जागीच ठार झाले, तर दांपत्यासह चिमुकली गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरु वारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झाला.येथील विधायक कार्य समितीचे सेवानिवृत्त शिक्षक दादाजी नामदेव पवार यांचे चिरंजीव योगेश पवार (३२) हे रात्री घरी जेवण करून ठेंगोड येथे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात योगेशच्या छातीला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले, तर आराई येथील नितीन सोनवणे (३२), कविता नितीन सोनवणे (२६), छकुली (३) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. पवार मूळ दरेगाव येथील रहिवासी असून, ते ताहाराबाद येथे व्यवसाय करत होते. शुक्रवारी घरी आल्यानंतर त्यांना पैसे घेण्यासाठी भ्रमध्वनी आला होता. सव्वानऊ वाजता घरी जेवण केल्यानंतर ते मित्राची दुचाकी घेऊन ठेंगोड्याकडे निघाले होते. मात्र काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
सटाण्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:10 IST
सटाणा : देवळा रस्त्यावरील तुरकीहुडी नजीक दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात येथील छायाचित्रकार योगेश दादाजी पवार जागीच ठार झाले, तर दांपत्यासह चिमुकली गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरु वारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झाला.
सटाण्याजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्दे दांपत्यासह चिमुकली गंभीर जखमी झाली.