शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:31 IST

रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत बळजबरीने वाद घालून कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना पंचवटी परिसरात जनार्दननगर भागात घडली. जखमी अनिल गोसावी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक : रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत बळजबरीने वाद घालून कुरापत काढत धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना पंचवटी परिसरात जनार्दननगर भागात घडली. जखमी अनिल गोसावी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोपटराव रामभाऊ काकळीज (६८ रा. म्हसरूळ) हे शनिवारी रात्रीच्या सुमारास अनिल वाल्मीक गोसावी (३९) यांच्यासमवेत दुचाकीवरून जनार्दननगर परिसरातून मार्गस्थ होत होते. यावेळी पाठीमागून एका दुचाकीवर तिघे अज्ञात युवक आले आणि त्यांनी काकळीज यांच्या दुचाकीला ‘कट’ देत खाली पाडले. तिघा संशयितांनी काकळीज व गोसावी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने गोसावी यास मुलीची छेड का काढतो, असे म्हणत त्याच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गोसावी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक गिरमे करीत आहेत.ट्रॅक्टर उलटल्याने एक ठारनाशिक : गौळाणे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडलीआहे. संतोष मधुकर चारोस्कर (रा. दीक्षी गौळाणे) असे मृताचे नाव आहे. चारोस्कर रविवारी (दि.४) लोकेश गवळी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना हा अपघात झाला. गौळाणे शिवारातील कचरा डेपोजवळच्या चौफुलीवर भरधाव ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात चारोस्कर गंभीर जखमी झाले. मालक गवळी यांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी