नाशिक : दुचाकीला अडकवलेली पैशांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, टिळकवाडी येथील सरदार बंगल्यात राहणारे रवींद्रसिंग गुरुदयालसिंग मैनी (६३) हे शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास द्वारकेवरील एका प्लायवूडच्या दुकानात गेले़ यावेळी त्यांनी आपल्या दुचाकीला अडकवलेली होती़ त्यामध्ये बॅगेत २२ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाइल ठेवलेला होता़ अज्ञात चोरट्याने ही बॅग चोरून नेली़ याप्रकरणी मैनी यांनी दिलेल्या फि र्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला़
दुचाकीला अडकवलेली ्रपैशांची बॅग लंपास
By admin | Updated: July 15, 2014 00:53 IST