शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

नाशकात आॅनलाइन फसवणुकीचे दोघे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:05 IST

‘फोन-पे’वरील सवलत कूपनचे तसेच कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून आॅनलाइन मागविलेल्या वस्तूच्या ताब्यासाठी रक्कम भरावयास सांगून दोघांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : ‘फोन-पे’वरील सवलत कूपनचे तसेच कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून आॅनलाइन मागविलेल्या वस्तूच्या ताब्यासाठी रक्कम भरावयास सांगून दोघांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अ‍ॅड. किशन चावला यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २४ जानेवारी रोजी अज्ञात संशयिताने मोबाइलवर फोन केला. संशयिताने फोन पे या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. आर्थिक व्यवहारात ४ हजारांचे सवलतीचे कूपन मिळणार असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयिताने त्यांची गोपनीय माहिती त्या भामट्याने जाणून घेत १५ हजार ४०० रु पयांना गंडा घातला.दुसऱ्या घटनेत देवळाली कॅम्प येथील अनुप व्ही. नारायण यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आॅनलाइन वस्तू खरेदी केली होती. त्यांची वस्तू कुरियरच्या माध्यमातून येणार होती. परंतु ती वेळेत येत नसल्याने त्यांनी गुगल या संकेतस्थळावर कुरियर कंपनीचा संपर्क क्रमांक शोधला आणि त्यावर त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना पाथर्डी फाटा येथील एका कुरियर कंपनीच्या शाखेतून फोन आला व संशयिताने त्यांना वस्तू मिळविण्यासाठी गोपनीय माहितीची विचारपूस करतआॅनलाइन ३६ हजार ४१४ रु पयांचा गंडा घातला.या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcyber crimeसायबर क्राइम