नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असताना, पेठरोडवर रिक्षा व चारचाकी वाहनातून १२ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. पंचवटी पोलिसांनी मद्यासह दोन वाहने जप्त केली आहेत. लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहन तपासणी केली जात होती. यादरम्यान पेठरोडवर चारचाकी वाहन (एमएच ०४ सीबी-५२७७) आणि रिक्षा (एमएच १५ - १९३३) या वाहनांतून देशी-विदेशी मद्याच्या १२ खोक्यांतून सुमारे १२ हजार रुपयांचे मद्य मिळून आले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी यादव बोडके (आशावाडी, दिंडोरी), सुरेश पांडे (महादेववाडी, पंचवटी) यांना अटक केली. सदरची कारवाई पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे व पथकाने केली.
मद्यासह दोन वाहने जप्त
By admin | Updated: May 16, 2014 00:27 IST