शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ परिसरातील दोन अट्टल घरफोड्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:45 IST

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना नाशिकरोड परिसरातून अटक केली आहे़

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना नाशिकरोड परिसरातून अटक केली आहे़ अलोक ऊर्फ राजन मुनचुंग सिंग (२०, रा. खांडवेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) व राहुल बाविस्कर (२७, रा. उर्दू शाळेजवळील चाळ, साईनाथनगर, जेलरोड) अशी अटक केलेल्या संशयितांनी नावे असून, त्यांच्याकडून ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ युनिट एकचे पोलीस हवालदार रवींद्र बागुल यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित नाशिकरोड परिसरातील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह एक पथक तयार करून साईनाथनगर परिसरातील घरी छापा टाकला असता संशयित राहुल बाविस्कर पोलिसांच्या हाती लागला़ पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता काही महिन्यांपूर्वी आपल्या साथीदारासह म्हसरूळ परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली़  पोलिसांनी त्याचा साथीदार संशयित अलोक सिंग यास अटक करून चौकशी केली असता घरफोडीत चोरलेले दागिने त्यांनी एका सराफाला खोटी माहिती देऊन विक्री केल्याचे सांगितले़ पोलिसांनी या सराफाकडून ५१ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम सोन्याची लगड, १६ हजार रुपये किमतीची ४०० ग्रॅम वजनाची चांदी असा ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केलाआहे़ दरम्यान, या दोघा संशयितांकडून शहरातील आणखी काही घरफोड्यांच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे़ सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल, मोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा