शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोघा पोलीसपुत्रांसह पाच सराईत दोन वर्षांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 19:14 IST

कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत एकूण १२५ गुन्हेगारांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ११ गुन्हेगार रडारवर

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने सराईत गुन्हेगारांची चौकशी करून तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जात आहे. परिमंडळ-१चे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दोन पोलीसपुत्रांसह पाच सराईत गुन्हेगारांना पुढील दोन वर्षांसाठी शहरासह जिल्ह्यातून सोमवारी (दि.१) तडीपार केले. आतापर्यंत एकूण १२५ गुन्हेगारांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठविण्यात आले आहे.कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये पाटील यांनी पोलीस मुख्यालयात राहणारे पोलीसपुत्र कृष्णा मधुकर जाधव (१९), हेमंत शांतीलाल परदेशी (२३) यांच्यासह राहुल रतन खैरे (२१, रा. दिंडोरीरोड), विकी ऊर्फटमाट्या श्यामलाल कुटे (२३, रा. मल्हारखाण झोपडपट्टी), फरहान ऊर्फदहशत कलीम शेख (२०, रा. चौकमंडई, जुने नाशिक), समीर मुनीर सय्यद (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) आणि मुस्तकीम ऊर्फ मज्जा रहिम खान (२८, रा. वडाळानाका) या सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.११ गुन्हेगार रडारवरशहरातील परिमंडळ एकमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून आत्तापर्यंत १२५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचाही तडीपारीचा प्रस्ताव तयार केला गेला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच एका टोळीवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी