शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:03 IST

झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते.

नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आणि भाजपकडून अशोक उईके या दोन आदिवासी आमदारांनी शपथ घेतल्याने या दोन्हींपैकी आदिवासी विकास मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे समाजबांधवांचे आणि या नेत्यांच्या कार्यकर्त्याचेही लक्ष लागून आहे. 

मागील मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित यांच्या रूपाने भाजपकडे आदिवासी विकास मंत्र्यांची जबाबदारी होती, परंतु या निवडणुकीत गावित यांची मुलगी आणि दोन्ही भाऊ यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने गावित यांच्याविषयीची नाराजी होती. शपथविधी यादीत त्यांचे नाव नसल्याने आदिवासी विभागाला नवा चेहरा मिळणार असल्याचे निश्चित आहे. परंतु हे खाते भाजपकडेच जाणार की, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आदिवासी आमदारांचे नेतृत्व आणि पेसा भरतीवरून मंत्रालयात आंदोलन केल्यामुळे झिरवळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी आदिवासी आमदारांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी लॉबिंगही केले अन् झिरवळ यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली. राज्यातील आणखी एक आदिवासी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे भाजपचे आ. अशोक उईके यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे साहजिकच आदिवासी विकासमंत्रिपद कुणाच्या वाट्याला येईल, याबाबतची चर्चा सुरू झाली. मागील मंत्रिमंडळात भाजपकडे आदिवासी विभाग होता. त्यामुळे यंदाही तो भाजप आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. याशिवाय झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते. त्यामुळे या पदावर कुणाला संधी मिळणार यासाठी रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, मागील पंचवार्षिकमध्ये उईके यांच्याकडे चार महिन्यांसाठी आदिवासी विकास विभागाचा कार्यभार देण्यात आलेला होता. भाजपचे ते निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जातात. ते २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून २००४, २०१४ व २०१९, २०१४ या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवळ चार वेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे निष्ठा आणि ज्येष्ठत्वाच्या मुद्यावरदेखील दोघांमध्ये चुरस असेल. 

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारdindori-acदिंडोरी