शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:05 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुरुचरणसिंग बलकार सिंग (२६,रा़ गुरुद्वारा वाडा साहिब लोदिपूर तहसील आनंदपूर पंजाब) व महेंद्र सुदाम धवडगे (२८, रा़ रंगरेज मळा कलानगर इंदिरानगर) या दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी शुक्रवारी (दि़१) पत्रकार परिषदेत दिली़

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गुरुचरणसिंग बलकार सिंग (२६,रा़ गुरुद्वारा वाडा साहिब लोदिपूर तहसील आनंदपूर पंजाब) व महेंद्र सुदाम धवडगे (२८, रा़ रंगरेज मळा कलानगर इंदिरानगर) या दोन संशयितांकडून सोळा तलवारी जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी शुक्रवारी (दि़१) पत्रकार परिषदेत दिली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालीत होते़ पथकातील विनोद खांडबहाले यांना सराफनगरमधील साई इंटरप्रायजेस वॉटर सर्व्हिसेसच्या रोडलगत पॅशन दुचाकीवर दोन संशयित कापडी पिशवीत बेकायदेशीररीत्या तलवारी घेऊन आल्याची माहिती मिळाली़  त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांना दिली़ गुन्हे शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे, विनोद खांडबहाले, रमेश टोपले, राजू राऊत, राजेश निकम, भगवान शिंदे, शरद अहेर यांनी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी पोहोचले़ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पॅशन दुचाकीवर जात असलेल्या दोन संशयितांना पाठलाग करून पकडले़  पॅशन दुचाकीवरील संशयित गुरुचरण सिंग व महेंद्र धवडगे या दोघांकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी आणलेल्या सोळा तलवारी आढळून आल्या़ या दोघांकडील तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्यावर बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्या प्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  दरम्यान, धबडगे महाविद्यालयीन कर्मचारी बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित महेंद्र धबडगे हा गुरूगोविंद सिंग महाविद्यालयातील कर्मचारी आहे़ संशयित चरणसिंग हा महाविद्यालयात कडे विकण्यासाठी आला असता त्याच्याशी धबडगेची ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय