शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील दोघा संशयिताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:20 IST

सिन्नर - घोटी मार्गावर तालुक्यातील घोरवड गावाजवळ शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र,७ जणांच्या टोळीतील ५ जण फरार झाले आहेत.

सिन्नर : सिन्नर - घोटी मार्गावर तालुक्यातील घोरवड गावाजवळ शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र,७ जणांच्या टोळीतील ५ जण फरार झाले आहेत.घोटीहून सिन्नरच्या दिशेने स्क्रॅप मटेरियल घेऊन एक ट्रक शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जात होता. त्या दरम्यान साकूरफाटा येथून तीन मोटारसायकलवर प्रत्येकी तीन जण असे नऊ चोरट्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. घोरवड गावाजवळ आल्यानंतर त्यातील एकाने रस्त्यात मोटारसायकल आडवी लावून ट्रकला थांबविले. ट्रकचालक व क्लीनरला खाली ओढत चोरट्यांनी शिवीगाळ करत लुटण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ लहानू हगवणे, दिलीप हगवणे, बाळूहगवणे, हरिभाऊ हगवणे, किरण हगवणे, माधव हगवणे, रामदास हगवणे, सागर म्हसाळ, सोमनाथ गायकवाड, धनंजय माळी, सुखदेव लहामटे आदींनी धाव घेतली. त्यांनी संशियत चोरट्यांना पकडून ठेवले व ताबडतोब सिन्नर पोलिसांना माहिती दिली.पोलीस हवालदार मधुकर खुळे, हरिश्चंद्र गोसावी, राहुल निरगुडे, सुशील शिंदे, विनायक आहेर आदींनी तात्काळ घटनास्थळी पोहचून संदीप देवराव कोकाटे (२०) व ज्ञानेश्वर काळू जळंदे (१९), दोघेही राहणार शेणवड, ता. इगतपुरी या संशियत चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यातील पाच जण मात्र फरार झाले. संशियत चोरट्यांकडून मोटारसायलसह एक तलवार व इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.सिन्नर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीकांत गारूंगे, नवनाथ शिरोळे, पाठक अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस