शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साळसाणे येथील घरफोडी प्रकरणी दोन संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:25 IST

चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

चांदवड : तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.तालुक्यातील साळसाणे येथील विजय दामू ठाकरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरी करुन दोन लाख दहा हजार रुपये रोख, साठ हजार रुपयाचे मंगळसूत्र , दहा हजार रुपयाच्या तोळबंद्या, २० हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद विजय ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, अरुण पगारे, मंगेश गोसावी, सुशांत मार्कंड , हेमंत गिलबिले यांच्या पथकाने निफाड तालुक्यातील नैताळे येथे संशयित संदीप उर्फ संदेश संजय भोसले (२१) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि.नगर, लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (२४) रा.माहेरवाडी कोळगाव ता. श्रीगोंदा जि.नगर या दोघांना दि. २० फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांना चांदवड पोलीस स्टेशनला अटक करुन ठेवण्यात आले.दरम्यान चांदवड जेलमध्ये संशयित लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे याने भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या समजते. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले.या दोघांना चांदवड न्यायालयात न्या. एस.बी. वाळके यांच्या समोर उभे केले असता त्यांना दि. २२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जाधव, राजेंद्र बिन्नर हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक