नाशिक : मुंबई येथे पार पडलेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या प्रशांत नागरे व मनीषा राठोड यांनी दोन रौप्य पदके पटकावली़ नाशिक येथील एक्स एल टार्गेट असोसिएशनची खेळाडू मनीषा राठोड हिने कनिष्ठ व युवा गटात एअर पिस्तोल प्रकारात दोन रौप्य पदके पटकावली़ तिने पात्रता फे रीत ८० वरून तिसरे स्थान मिळवले आहे़ प्रशांत नागरे याने वरिष्ठ गटात १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात कांस्य पदक मिळवले़ त्याने पात्रता फेरीत ६० वरून ६ वे स्थान मिळवले आहे़ या खेळाडूंना मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम, प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले आहे़
राज्य नेमबाजी स्पर्धेत नाशिकला दोन रौप्य एक कांस्य
By admin | Updated: October 13, 2014 00:47 IST