शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासात ठोकल्या दोघा लुटारूंना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 01:16 IST

दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासात शोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासातशोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत द्वारकेजवळ फिर्यादी गौरव बाळासाहेब परदेशी व त्यांचा मित्र मोहसीन सय्यद हे दुचाकीने (एमएच १५ जीयू ६२१५) पोहोचले असता तेथे त्यांचा पाठलाग करत अ‍ॅक्टिवावरून (एमएच १५ एफबी ६८३८) दोघा अज्ञात लुटारुंनी येत त्यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने रोखून धरले.यावेळी त्यांनी मोहसीनला खाली ओढत फोनवर ‘कोणाला तरी बकरा मिळाला टाकू का मारून’ असे विचारले व त्यानंतर दम भरल्याचे गौरवने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्याजवळील मोबाइल व तीन हजारांची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्र ार दिली.कसून चौकशीपोलिसांनी तत्काळ दोघा अज्ञात लुटारुंविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करत दुचाकीच्या क्र मांकावरून सहायक निरीक्षक डी. डी. इंगोले यांच्या पथकाने शोध घेत शंकर सतीश रिडलॉन (रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), नितीन किरण पवार (रा.बजरंगवाडी) या दोघा संशयितांना रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून, सोमवारी संबंधितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक