शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी दळली दोन क्विंटल हळद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:58 IST

प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

निºहाळे : प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.  प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडोबा महाराज  यात्रेस गुरुवारी (दि. १) प्रारंभ होत आहे. यात्रेपूर्वी दळलेल्या हळद-भंडाºयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.  यात्रेपूर्वी रथसप्तमीपासून हळद दळण्याची तयारी केली जाते. मºहळ येथील जय मल्हार बचतगटाच्या अध्यक्ष सुनंदाबाई आढाव यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जीपमधून प्रवास करीत नाशिक, पांगरी, सोमठाणे, निºहाळे, नांदूरशिंगोटे, दोडी, खंबाळे, वावी, येवला, वळदगाव, शिरसगाव लौकी, पिंपळखुटे, कोपरगाव, शिंगणापूर, तीन चारी, जोर्वे, संगमनेर, नाशिक या गावांतील महिलांना खोबºयाची वाटी व भंडारा देत यात्रेसाठी हळद दळण्याचे निमंत्रण दिले होते.यात्रेपूर्वी जात्यावर दळलेली हळद घेऊन यायची, तिची गावातून मिरवणूक काढायची व यात्रेसाठी देवाच्या चरणी अर्पण करायची अशी परंपरा आहे. गावागावांतील महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.पंधरा दिवसांपासून तयारी मºहळ येथील महिलांनी मारुती मंदिरात जाते रोवले. त्यावर १५ दिवसांपासून खंडोबाचे गाणे गात हळद दळण्यास प्रारंभ करून दोन क्विंटल हळद दळली तर गावागावांतूनही तेवढीच हळद घेऊन महिला टेम्पो, ट्रक आदी वाहने घेऊन दाखल झाल्या. मारुती मंदिरापासून हळदीची मिरवणूक सुरू झाली. देवाच्या चरणी भंडारा अर्पण करण्यात आला.

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्राNashikनाशिक