शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमिषाने लुटणाऱ्या दोन टोळ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:55 IST

नाशिक : कारचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसविणाºया दिल्लीतील दोन टोळ्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे़ कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाºया या टोळीतील कंपनीचा मालक संशयित शत्रुघ्नकुमार बिंदेश्वर राय (२३), कॉल सेंटरमध्ये काम करणारे प्रकाश सिद्धार्थ सोनटक्के (२१), आकाश श्यामकुमार गुप्ता (२०) आणि मोबीन महंमद अस्लम (२०, सर्व रा. नवी दिल्ली) यांना सायबर शाखेने दिल्लीहून अटक केली़

ठळक मुद्देकॉल सेंटरद्वारे फसवणूक कारचे आमिष; सहा संशयितांना अटक

नाशिक : कारचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसविणाºया दिल्लीतील दोन टोळ्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे़ कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाºया या टोळीतील कंपनीचा मालक संशयित शत्रुघ्नकुमार बिंदेश्वर राय (२३), कॉल सेंटरमध्ये काम करणारे प्रकाश सिद्धार्थ सोनटक्के (२१), आकाश श्यामकुमार गुप्ता (२०) आणि मोबीन महंमद अस्लम (२०, सर्व रा. नवी दिल्ली) यांना सायबर शाखेने दिल्लीहून अटक केली़१६ मे २०१८ रोजी बक्षिसामध्ये कार लागल्याचे सांगत संशयितांनी शहरातील स्मिता पाटील या महिलेची एक लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी पाटील यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ मात्र पाटील यांनी ही रक्कम पेटीएम आणि बँकेतील खात्याद्वारे संशयितांच्या बँकेत वर्ग केली होती़ सायबर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता हे पैसे वर्ल्डशॉपी, शॉपीबाय सिलेक्टक़ॉम आणि प्ल्युटीकार्ड या कंपन्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे समोर आले़ याबाबत सखोल चौकशीत या सर्व कंपन्या दिल्ली येथील तसेच एकाच मालकाच्या असल्याचे समोर आले आहे.सायबर पोलिसांचे एक पथक दिल्लीतील ओखला इंडस्ट्रीयल परिसरातील एफ ९५, ग्राउंड प्लोअर येथे पोहचले. या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्लुटोकार्ड नावाच्या कॉलसेंटरवर छापा मारून राय, सोनटक्के, गुप्ता व अस्लम या चौघा संशयितांना अटक केली.या चौघांकडून कॉलसाठी वापरले जाणारे १६ मोबाइल, ११ हार्डडिस्क आणि कॉलसेंटरमधील साहित्य असा १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या संशयितांना न्यायालयात हजर केले असता १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ त्यांच्याकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़फसवणुकीच्या गुन्ह्याची उकलकारचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून नीलेश बाबाजी मंडलिक यांची चार लाख ७४ हजार ३१५ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतील वसंत विहार परिसरातून सुनीता गोवर्धन नेगी (२७, रा. आयआयटी कॅम्पस, नवी दिल्ली) आणि सय्यद रझा महंमदअली हुसेन झैदी (२४, रा. डी २१, ओखला विहार, जामीयानगर) या दोघांना अटक केली आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक