शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:58 IST

शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली.

नाशिक : शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली. तर महात्मानगर परिसरातून दुचाकी आणि पाथर्डी गौळाणे रोड परिसरातून एक स्कूटर चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.पंचवटीतील दिलीप वामन गवळी (५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मखमलाबाद नाका भागातील काकड चाळ येथूनगुरुवारी (दि. ८) रात्री साडेदहा ते शुक्रवारी (दि.९) सकाळी सात वाजेदरम्यान आॅटो रिक्षा क्रमांक एमएच १५ एके ५६७० चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी चोरीची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या रविवार-सोमवारच्या रात्री घडली. महात्मानगर येथील शिवशक्ती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून रविवारी (दि. ४) रोजी चोरट्यांनी लाल रंगाची पल्सर चोरून नेल्याची फिर्याद सागर कुशल बेंडकुळे (२१) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.अ‍ॅक्टीव्हाची चोरीइंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ आॅक्टोबरच्या रात्री सव्वासहा वाजेनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास पाथर्डी-गौळाणे रोड परिसरातील ईश्वरी पॅराडाईजच्या पार्किंगमधून राखाडी रंगाची अ‍ॅक्टीव्हा मोपेड स्कूटर चोरीला गेली. याप्रकरणी माधुरी भाऊसाहेब पाटील यांनी रविवारी (दि. ११) दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी