शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

दारूच्या गुदाम लुटीतील आणखी दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:17 IST

लोहिया कंपाउंडमधील राजस्थान लिकर कंपनीच्या गोदामाची माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मंजूर रसुल पिंजारी (वय ३०, रा. वडाळागाव) आणि चंद्रकांत रामचंद्र सिनोरे (४१, रा. सिन्नर) अशी  संशयितांची नावे आहेत.

ठळक मुद्देसराईत गुन्हेगार : पिंजारीविरुद्ध अकरा गुन्हे

नाशिक : येथील लोहिया कंपाउंडमधील राजस्थान लिकर कंपनीच्या गोदामाची माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मंजूर रसुल पिंजारी (वय ३०, रा. वडाळागाव) आणि चंद्रकांत रामचंद्र सिनोरे (४१, रा. सिन्नर) अशी  संशयितांची नावे आहेत.शिंदे गाव येथे ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास दरोडेखाेरांनी सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून तेथील सुमारे २७ लाख रुपयांचा मद्यसाठा लुटला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या पथकाने नवी मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तपास करून परराज्यांमधील दोघा सराईत गुन्हेगारांना पकडले होते. त्यांच्याकडील चौकशीतून त्यांना गोदामाची माहिती स्थानिक गुन्हेगाराने दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मंजूर पिंजारी व चंद्रकांत सिनोरे यांना ताब्यात घेतले. मंजूर पिंजारी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात दराेडा, चोरी, घरफोडी असे ११ गुन्हे दाखल असून, चंद्रकांत सिनोरे याच्याविरोधातही दरोडा, चोरी, आर्मॲक्ट असे तीन गुन्हे दाखल आहेत. सिनोरे याने गोदामाची रेकी करून त्याची माहिती दरोडेखोरांना दिल्याचे समोर आले आहे, तर पिंजारी हा दरोड्यात सहभागी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस २० लाख रुपयांची तीन वाहने, २३ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून, सराईत गुन्हेगार मुक्तार अहमद शेख (३५, रा. जम्मू काश्मीर), शंकर मंजू गौडा (४४, रा. कर्नाटक) यांनाही अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक